गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपास सुरुवात
गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपास सुरुवात गेवराई - महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनाही विमा मिळावा यासाठी पुजा अशोक मोरे पंचायत समिती सदस्य, गेवराई तथा प्रदेशाध्यक्ष (यु.आ) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले असून गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पूजा मोरे यांनी सांगितले की शेतकरी बांधवांनी एकजुटीने केलेल्या संघर्षाचा हा विजय आहे. गावपातळीपासून सुरू केलेल्या आंदोलनात पुणे, मुंबई, जालना, बुलढाणा व नाशिक येथे सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्याचे आभार मानले. तसेच यापूर्वीचे खरीप २०२० ...