Posts

पत्ते खेळण्यावरून कामगारांच्या दोन गटात हाणामारी

  पत्ते खेळण्यावरून कामगारांच्या दोन गटात हाणामारी तीन कामगार जखमी मिरारोड - मिरा भाईंदर मधील मेट्रोचे ठेकेदार जे.कुमार यांच्या कामगारांच्या दोन गटामध्ये मंगळवारी रात्री काशिमिरा येथे पत्ते खेळण्यावरून वाद झाला व त्यानंतर तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये तीन कामगार जबर जखमी झाले आहेत. या हाणामारी मुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   मिरा भाईंदर शहरात मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी व कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. जे कुमार ठेकेदाराला महापालिकेने काशिमिरा प्लेझंट पार्क येथे आर एम सी प्लांट व साहित्य ठेवण्यासाठी आरक्षण असलेली जागा उपलब्ध करून दिली आहे.  या जागेमध्ये आर एम सी प्लांट उभारण्यात आला असून तेथेच इतर साहित्य व कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामगारांकडून यापूर्वी देखील अनेक वेळा मारामाऱ्या झाल्याचे प्रकार घडले आहेत.  जे कुमार ठेकेदाराकडे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार हे कामाला आहेत. यांची पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहरात अशा गुन्हेगारी प्रवूत्तीच्या लो...

दासखेड येथील शेतकऱ्याचे ७० हजाराचे सोयाबीन चोरीला

  दासखेड येथील शेतकऱ्याचे ७० हजाराचे सोयाबीन चोरीला  प्रतिनिधी (पाटोदा ) तालुक्यातील दासखेड या गावातील शेतकरी युवराज परमेश्वर कोकाटे हे आपल्या पुर्ण कुटुंबासोबत शेतात वस्तीकरून राहत आहेत. दि.१८ शुक्रवार रोजी रात्री झोपल्यानंतर रात्री १:३० च्या दरम्यान कुत्रे भुकू लागल्याने कोकाटे यांना जाग आली. दार उघडण्यासाठी गेल्यानंतर लक्षात आले की बाहेरून दाराची कडी लावलेली लक्षात आले.त्यांनी मोबाईल द्वारे त्यांच्या लहान बंधू यांच्याशी संपर्क साधत दार उघडण्याचे सांगितले दार उघडल्यानंतर वराड्यात ठेवण्यात आलेले २७ कट्टे सोयाबीन अंदाजे किमंत ७०.०००हजार रूपयांची सोयाबीन चोरीला गेल्याची दिसून आले. कोकाटे व शेजाऱ्यांनी आजुबाजुला धावपळ करून बघितले पण चोरटे पळुन जाण्यास यशस्वी झाल्याचे दिसून आल्याने युवराज कोकाटे यांनी पाटोदा पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.  ५७ कट्टे पिकलेले सोयाबीन घराच्या वराड्यात लावून ठेवलेले होते. दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री सर्वजण झोपले असता रात्री दीडच्या सुमारास कुत्रे भुकू लागल्याने त्यांना जाग आली झोपेतून उठल्यानंतर घराची कडी उघडण्यासाठ...

गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपास सुरुवात

Image
  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपास सुरुवात गेवराई - महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीकविमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनाही विमा मिळावा यासाठी पुजा अशोक मोरे पंचायत समिती सदस्य, गेवराई तथा प्रदेशाध्यक्ष (यु.आ) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले असून  गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२१ च्या पीकविमा वाटपास सुरुवात झाली आहे.     बीड जिल्ह्यातील सर्वच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. पूजा मोरे यांनी सांगितले की शेतकरी बांधवांनी  एकजुटीने केलेल्या संघर्षाचा हा विजय आहे. गावपातळीपासून सुरू केलेल्या आंदोलनात पुणे, मुंबई, जालना, बुलढाणा व नाशिक येथे सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्याचे आभार मानले. तसेच यापूर्वीचे खरीप २०२० ...

दिव्यात भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांना आगरी समाज माफ करणार नाही

  दिव्यात  भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांना आगरी समाज माफ करणार नाही भाजपचे रोहिदास मुंडे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा ठाणे :-दिव्यात भूमीपुत्रांच्या बांधकांनावर होणारी कारवाई ही  शिवसेनेचे रमाकांत मढवी यांच्या इशाऱ्यावर होते असा आरोप भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला असून आगरी समाजावर अन्याय करणाऱ्यांना भूमिपुत्र माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. स्थानिक आगरी भूमीपुत्रांवर कारवाई करणाऱ्याना  आगरी समाज निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा रोहिदास मुंडे यांनी मढवी यांना दिला आहे. सतत होणाऱ्या कारवाईमुळे दिवा आणि आजूबाजूच्या भागात गरजेपोटी बांधकाम करणाऱ्या भूमिपुत्रांची आर्थिक कोंडी होत असून भूमिपुत्र बरबाद होत आहेत असे मुंडे यांनी म्हटले आहे. भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेले घरे तोडण्या पेक्षा यांनी अधिकृत इमारती मधील अनधिकृत बांधकामे तोडावीत असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे.  लीगल इमारती मध्ये अनधिकृत कामे करणाऱ्या मोठ्या बिल्डरांवर तसेच रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर मढवी का कारवाई करत नाहीत असा सवाल रोहिदास मुंडे यांनी केला...