दासखेड येथील शेतकऱ्याचे ७० हजाराचे सोयाबीन चोरीला
दासखेड येथील शेतकऱ्याचे ७० हजाराचे सोयाबीन चोरीला
प्रतिनिधी (पाटोदा )
तालुक्यातील दासखेड या गावातील शेतकरी युवराज परमेश्वर कोकाटे हे आपल्या पुर्ण कुटुंबासोबत शेतात वस्तीकरून राहत आहेत. दि.१८ शुक्रवार रोजी रात्री झोपल्यानंतर रात्री १:३० च्या दरम्यान कुत्रे भुकू लागल्याने कोकाटे यांना जाग आली. दार उघडण्यासाठी गेल्यानंतर लक्षात आले की बाहेरून दाराची कडी लावलेली लक्षात आले.त्यांनी मोबाईल द्वारे त्यांच्या लहान बंधू यांच्याशी संपर्क साधत दार उघडण्याचे सांगितले दार उघडल्यानंतर वराड्यात ठेवण्यात आलेले २७ कट्टे सोयाबीन अंदाजे किमंत ७०.०००हजार रूपयांची सोयाबीन चोरीला गेल्याची दिसून आले. कोकाटे व शेजाऱ्यांनी आजुबाजुला धावपळ करून बघितले पण चोरटे पळुन जाण्यास यशस्वी झाल्याचे दिसून आल्याने युवराज कोकाटे यांनी पाटोदा पोलीस ठाणे गाठून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
५७ कट्टे पिकलेले सोयाबीन घराच्या वराड्यात लावून ठेवलेले होते. दि.१८ नोव्हेंबर रोजी रात्री सर्वजण झोपले असता रात्री दीडच्या सुमारास कुत्रे भुकू लागल्याने त्यांना जाग आली झोपेतून उठल्यानंतर घराची कडी उघडण्यासाठी गेले असता दरवाज्याला बाहेरून कडी लावलेल्याचे दिसून आले. त्यांचे बंधू गोपाळराव यास फोन करून उठविले व घरची कडी बाहेरून उघडण्यास लावले घरा बाहेर आले असता सोयाबीन चोरी गेल्याचे लक्षात आले सोयाबीनच्या ठेवलेल्या कट्ट्या पैकी २७ कट्टे अंदाजे ५० किलो वजनाचेए चोरीस गेलेले दिसून येताच शेजारील अशोक राम कोकाटे, भाऊसाहेब माणिक कोकाटे, व इतर लोकांनी आजूबाजूला पाहिले असता सोयाबीन घेऊन चोरटे पसार झाल्याचे दिसून आले. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पतंगे आणि पोलीस हवालदार मच्छिंद्र उबाळे हे घेत आहेत
Comments
Post a Comment