Posts

Showing posts from August, 2021

दिव्यात भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांना आगरी समाज माफ करणार नाही

  दिव्यात  भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांना आगरी समाज माफ करणार नाही भाजपचे रोहिदास मुंडे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा ठाणे :-दिव्यात भूमीपुत्रांच्या बांधकांनावर होणारी कारवाई ही  शिवसेनेचे रमाकांत मढवी यांच्या इशाऱ्यावर होते असा आरोप भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला असून आगरी समाजावर अन्याय करणाऱ्यांना भूमिपुत्र माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. स्थानिक आगरी भूमीपुत्रांवर कारवाई करणाऱ्याना  आगरी समाज निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा रोहिदास मुंडे यांनी मढवी यांना दिला आहे. सतत होणाऱ्या कारवाईमुळे दिवा आणि आजूबाजूच्या भागात गरजेपोटी बांधकाम करणाऱ्या भूमिपुत्रांची आर्थिक कोंडी होत असून भूमिपुत्र बरबाद होत आहेत असे मुंडे यांनी म्हटले आहे. भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेले घरे तोडण्या पेक्षा यांनी अधिकृत इमारती मधील अनधिकृत बांधकामे तोडावीत असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे.  लीगल इमारती मध्ये अनधिकृत कामे करणाऱ्या मोठ्या बिल्डरांवर तसेच रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर मढवी का कारवाई करत नाहीत असा सवाल रोहिदास मुंडे यांनी केला...