दिव्यात भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांना आगरी समाज माफ करणार नाही

 दिव्यात  भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई करणाऱ्यांना आगरी समाज माफ करणार नाही


भाजपचे रोहिदास मुंडे यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा


ठाणे:-दिव्यात भूमीपुत्रांच्या बांधकांनावर होणारी कारवाई ही  शिवसेनेचे रमाकांत मढवी यांच्या इशाऱ्यावर होते असा आरोप भाजपचे रोहिदास मुंडे यांनी केला असून आगरी समाजावर अन्याय करणाऱ्यांना भूमिपुत्र माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

स्थानिक आगरी भूमीपुत्रांवर कारवाई करणाऱ्याना  आगरी समाज निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा रोहिदास मुंडे यांनी मढवी यांना दिला आहे.

सतत होणाऱ्या कारवाईमुळे दिवा आणि आजूबाजूच्या भागात गरजेपोटी बांधकाम करणाऱ्या भूमिपुत्रांची आर्थिक कोंडी होत असून भूमिपुत्र बरबाद होत आहेत असे मुंडे यांनी म्हटले आहे.

भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेले घरे तोडण्या पेक्षा यांनी अधिकृत इमारती मधील अनधिकृत बांधकामे तोडावीत असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे.

 लीगल इमारती मध्ये अनधिकृत कामे करणाऱ्या मोठ्या बिल्डरांवर तसेच रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्यांवर मढवी का कारवाई करत नाहीत असा सवाल रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

शहरात 20 ये 25 वर्षांपूर्वी बांधलेल्या अनेक इमारती या दुरुस्त करणे गरजेचे असून अनेक चाळी या कायम पाण्याखाली जात असल्याने तेथील रहिवाशांना सोयीचे व्हावे यासाठी स्थानिक भूमिपुत्र त्यांच्या जागेतील चाळींची दुरुस्ती करत असताना गरीब व सामान्य भूमीपुत्रांच्या पोटावर पाय देण्याचे काम करणाऱ्यांना  येणाऱ्या निवडणुकीत येथील आगरी समाज  माफ करणार नाही असे रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत पुनर्विकास होत नाही तोपर्यंत येथील स्थानिकांनी त्यांच्या मालकी जागेत असणाऱ्या चाळींची दुरुस्ती करायची नाही का?की त्यात पाणी घुसून लोकांचे संसार उध्दवस्त होण्याची वाट पहायची असा सवाल देखील मुंडे यांनी केला आहे.

Comments