पत्ते खेळण्यावरून कामगारांच्या दोन गटात हाणामारी
पत्ते खेळण्यावरून कामगारांच्या दोन गटात हाणामारी तीन कामगार जखमी मिरारोड - मिरा भाईंदर मधील मेट्रोचे ठेकेदार जे.कुमार यांच्या कामगारांच्या दोन गटामध्ये मंगळवारी रात्री काशिमिरा येथे पत्ते खेळण्यावरून वाद झाला व त्यानंतर तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये तीन कामगार जबर जखमी झाले आहेत. या हाणामारी मुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरा भाईंदर शहरात मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी व कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. जे कुमार ठेकेदाराला महापालिकेने काशिमिरा प्लेझंट पार्क येथे आर एम सी प्लांट व साहित्य ठेवण्यासाठी आरक्षण असलेली जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेमध्ये आर एम सी प्लांट उभारण्यात आला असून तेथेच इतर साहित्य व कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामगारांकडून यापूर्वी देखील अनेक वेळा मारामाऱ्या झाल्याचे प्रकार घडले आहेत. जे कुमार ठेकेदाराकडे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार हे कामाला आहेत. यांची पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहरात अशा गुन्हेगारी प्रवूत्तीच्या लो...