पत्ते खेळण्यावरून कामगारांच्या दोन गटात हाणामारी
पत्ते खेळण्यावरून कामगारांच्या दोन गटात हाणामारी
तीन कामगार जखमी
मिरारोड - मिरा भाईंदर मधील मेट्रोचे ठेकेदार जे.कुमार यांच्या कामगारांच्या दोन गटामध्ये मंगळवारी रात्री काशिमिरा येथे पत्ते खेळण्यावरून वाद झाला व त्यानंतर तुफान हाणामारी झाली. या हाणामारी मध्ये तीन कामगार जबर जखमी झाले आहेत. या हाणामारी मुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिरा भाईंदर शहरात मेट्रोचे काम सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडी व कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. जे कुमार ठेकेदाराला महापालिकेने काशिमिरा प्लेझंट पार्क येथे आर एम सी प्लांट व साहित्य ठेवण्यासाठी आरक्षण असलेली जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेमध्ये आर एम सी प्लांट उभारण्यात आला असून तेथेच इतर साहित्य व कामगारांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामगारांकडून यापूर्वी देखील अनेक वेळा मारामाऱ्या झाल्याचे प्रकार घडले आहेत. जे कुमार ठेकेदाराकडे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार हे कामाला आहेत. यांची पोलिसांकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शहरात अशा गुन्हेगारी प्रवूत्तीच्या लोकांमुळे गुन्हेगारी वाढत असून ही पोलीसांची डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अशा कामगारांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
सोमवारी दुपारी दरोगा व टप-टिम मधील कामगार यांच्यामध्ये पत्ते खेळण्यावरुन वाद झाला होता व टप टिम मधील कामगार यांच्या काही लोकांनी कामगारांच्या रूम मध्ये येवून गुलजार अली याला मारहाण केली होती. त्यानंतर एकमेकांना समजावून हा वाद मिटवण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास लेबर कॉलनीच्या बाहेर
दरोगा , गुलजार , अशफाक , सोनु याना टप टिम चे सुपरवाजर आलम, राजा, मुझफर, सदाम, समीर, निजामुद्दीन व इतर असे ८ ते १० जण लोखंडी रॉड, सळई, लाकडी दांडक्यानी व लाथा बुक्कयानी मारहाण करत होते. त्यावेळी सुपरवायझर अभिषेक तिवारी हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याला ही जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये तिवारी हा बेशुद्ध पडला होता. या ठिकाणी मारहाण करताना मोठा गँगवार सुरू असल्याप्रमाणे कामगारांना मारहाण करण्यात येत होती. तिवारी , दरोगा राजमणी, नफीस अली यांना इंदिरागांधी रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी ते कामगार गंभीर जखमी असल्याने त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. इतर कामगारांनाही मारहाण करण्यात आली आहे. ए.एस इन्टरप्रायझेस ठेकेदाराचे कामगार दरोगा, राजमणी गौतम व टप टिमचे कामगार यांच्यामध्ये पत्ते खेळण्यावरून झालेल्या भांडणामुळे मनात राग धरुन टप टिमचे सुपरवाझर आलम व त्याचे कामगार राजा मुझफर, सदाम, समीर, निजामुद्दीन, व इतर असे ८ ते १० लोकांनी हातात लोखंडी रॉड सळई, लाकडी दांडके, घेवुन या कामगारांना जीवे मारण्याचे उद्देशाने हमला करून मारहाण करून जखमी केल्यामुळे टप टिमचे सुपरवाझर आलम व कामगार राजा, मुझफर सदाम, समीर, निजामुद्दीन व इतर ५ जनावर काशीमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आली आहे.
Comments
Post a Comment